भिवंडी मनपाचे स्व.परशुराम टावरे स्टेडियम मध्ये क्रीडास्पर्धा ऐवजी करमणुकीचा बाजार

भिवंडी दि.३ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बांधलेल्या भव्य स्व.परशुराम धोंडू टावरे स्टेडियम मध्ये स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी ठरली असून या स्टेडियम मधील  मैदानांवर करमणुकीचे साधने उपलब्ध करून क्रीडास्पर्धा ऐवजी करमणूक आणि मनोरंजनाचा बाजार मांडल्याने शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.          […]

Continue Reading

वाहन चालकांनो सावधान भिवंडीत लवकरच तिसरा डोळा टिपणार बेशिस्त वाहन चालकांना

भिवंडी : गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरांतर्गत सरकारी व मनपा परिवहन प्रवासी सेवा नसल्याने शहरात मोठ्या संख्येने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे.त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अनेकवेळा वाहनचालकांना आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर अंकुश आणण्यासाठी आता ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत भिवंडी शहरात वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वहतुकीच्या […]

Continue Reading

भिवंडीत बाईक रॅली व चौक सभांनी गाजला शेवटचा दिवस, उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

भिवंडी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी संपल्याने सायंकाळ पूर्वी सकाळपासून महायुती,महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी भिवंडी पूर्व,पश्चिम व ग्रामीण मतदार संघात बाईक रॅली व  पायी मतदारांशी संपर्क करीत चौक सभा करून शेवटचा दिवस गाजवला.भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्या थेट लढत होत असताना महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी व महाविकास आघाडीचे समाजवादी […]

Continue Reading

भिवंडीत डिलीट मतांविषयी नाही जागृती, पुन्हा उमेदवारांना बसणार मतांचा फटका

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांच्या नावासमोर डिलीट लिहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे हजारो मतदारांना मतदान करता आलेले नाही. मात्र या बाबत स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जागृती नसल्याने विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारांना मतदानाचा फटका बसणार आहे.                    गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या […]

Continue Reading

भिवंडीत महायुतीच्या प्रचारासाठी खासदार रवी किशन यांची सभा संपन्न

भिवंडी : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून, भिवंडी पश्चिम विधानसभेतील भाजपचे महायुतीचे उमेदवार महेश चौगुले यांच्या निवडणूक प्रचारासाठी भंडारी चौकात उत्तर भारतीय आघाडीच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी चित्रपट कलाकार, निर्माते, गोरखपूरचे खासदार रवि किशन हे उपस्थित झाले होते.               भिवंडी पश्चिम महायुतीचे भाजप […]

Continue Reading

भिवंडीत तेलंगणा वासियांचा पोशम्मा, देवीसाठी हजारो कोंबड्यांचा बळी

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे दोन लाखापेक्षा जास्त तेलंगणावासी तेलगू समाजाचे लोक राहत असून तेलंगणातील प्रत्येक उत्सव येथील हे तेलंगणावासी वर्षानुवर्षे साजरा करीत आले आहेत. तेलंगणामध्ये तत्कालीन असलेल्या गरिबीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजाराने अनेक बळी जात होते. त्यामुळे प्रत्येक गावात गावदेवीची पूजा बांधून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी देवीला साकडे घातले जात होते. तसेच कुटुंबाकडून […]

Continue Reading

भिवंडीतील जिल्हा परिषद शाळेत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुकीचा अभिनव उपक्रम

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कालवार येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या वर्गाचे मंत्रिमंडळ आणि ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवित भारताच्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. या प्रक्रियेचे पालकांकडून स्वागत करण्यात आले.                              भिवंडी तालुक्यातील कालवार जिल्हा परिषद […]

Continue Reading

महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडीच्या वतीने पत्रकार दिन साजरा

भिवंडी : शहरातील दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या महानगर प्रेस असोशिएशन ऑफ भिवंडी या संस्थेच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी महानगरपालिका उपायुक्त दीपक झिंजाड,वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. […]

Continue Reading

मार्गशीर्ष अमावास्येचा  वेळ अमावास्या उत्सव 

मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये सोलापूर, नांदेड उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे […]

Continue Reading

बेकायदेशीरपणे सुरू असलेले मोती कारखाने अडचणीत, मनपा प्रशासनाने नोटीस पाठवून मागितला खुलासा

भिवंडी,ता.२४ (बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सुमोटोनंतर संबंधित सरकारी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी महापालिकेला २० डिसेंबर रोजी नोटीस बजावून मोती कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरात सुरू असलेल्या मोती कारखान्यांना नोटीस पाठवून कारखान्याशी संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. अन्यथा कारखान्यांवर कारवाई […]

Continue Reading