भिवंडीत इस्कॉन मंदिरात श्री झूलन यात्रा महोत्सव

भिवंडी :  जगन्नाथ रथयात्रेच्या अभूतपूर्व यशानंतर इस्कॉन भिवंडीतर्फे २३ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत श्री श्री राधा माधव झूलन यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सहा दिवसीय आध्यात्मिक महोत्सवात दररोज आकर्षक पुष्पसजावटीने सुशोभित झुल्यावर श्री श्री राधा माधव यांना विराजमान करून विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.             […]

Continue Reading

महापालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार? जाब विचारीत राकाँपा शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांचे आंदोलन

भिवंडी : भिवंडीतील जनतेवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. शहरातील खड्डेमय रस्ते, रेयान एंटरप्रायझेस कंपनीमुळे अडचणीत सापडलेल्या लघु व्यापाऱ्यांच्या समस्या तसेच कोहिनूर इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू होऊनही दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) भिवंडी शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी […]

Continue Reading

मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास महामार्गाची दुरवस्था. होत आहे वाहतूक कोंडी

भिवंडी : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अविरत पावसाने मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास व जूना भिवंडी ठाणे महामार्गाचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असूनही या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.तसेच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Continue Reading

त्या नगरसेवकास अपात्र ठरवले जाऊ शकते.

उघडा डोळे वाचा नीट  भिवंडी : महाराष्ट्रात, एखाद्या नगरसेवकाने आपल्या जोडीदाराला किंवा नातेवाईकाला ‘नगरसेवक’ या अधिकृत पदाचा वापर करून स्वतःच्या वतीने काम करण्याची परवानगी दिल्यास, त्या नगरसेवकास अपात्र ठरवले जाऊ शकते. केवळ निवडून आलेल्या उमेदवारालाच अधिकृत कर्तव्ये पार पाडण्याचा कायदेशीर अधिकार असतो; प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या कोणाला तरी काम करू देणे (प्रॉक्सी), अधिकाराचा अनधिकृत वापर करणे […]

Continue Reading

भिवंडीत जुगार अड्ड्यांची वाढ ; महिलांनी उघडकीस आणले रॅकेट

भिवंडी :  भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात पुन्हा बेकायदेशीर ‘मटका’ जुगार अड्डे सुरु होऊन त्यामध्ये  वाढ झाल्याने या परिसरात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. या पूर्वी पोलिसांच्या कारवाईमुळे बंद पडलेले जुगाराचे अड्डे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आणि स्थानिक महिलांनी पुढाकार घेत एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि या अवैध […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिका ई-बस सेवा सुरू करणार, चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरु ,३५% काम पूर्ण

भिवंडी,ता.०१ (बातमीदार) :  शहरातील नागरिकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भिवंडी महानगरपालिकेच्या ई-बस सेवा सुरु करण्याच्या कामाला गती मिळाली असून हि सेवा कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत सुरु राहील. त्यासाठी सध्या भिवंडीत तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरु केले आहे.                    सध्या भिवंडी महानगरपालिकेची स्वतःची सिटी बस सेवा सुरु नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि […]

Continue Reading

भिवंडी मनपाचे अकार्यक्षम प्रभारी मार्केट अधिकारीला मनपा सेवेतून निलंबित करण्याची आयुक्तांकडे मागणी

भिवंडी,ता. १ (बातमीदार) : भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढत्या समस्या असताना,त्याचे निराकरण करण्यासाठी मनपाकडे वेळेवर निधी उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत पालिकेच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या वसुलीकडे पालिकेचा अनेक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर अंतर्गत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे,असा आरोप शहरातील समाजसेवी नागरिकांकडून केला जात असून गेल्या काही महिन्यापासून महापालिकेच्या उत्पन्नात घट दिसून आल्याने […]

Continue Reading

भिवंडीतील खोणी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक अपहार प्रकरणी ग्रामविकास अधिकारी निलंबित

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीमध्ये जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी ग्रामनिधी व वित्त आयोग निधी अंतर्गत मोठ्या रक्कमेचा अपहार करणे, ३ लाखाच्या खुल्या निविदा करणे बंधनकारक असताना निविदा प्रक्रियेचा अवलंब न करणे तसेच खोटे धनादेश काढणे, मर्जीतल्या ठेकेदारांना काम देणे, धनादेश ठेकेदाराच्या नावाने देणे बंधनकारक असताना धनादेशाची […]

Continue Reading

भिवंडी मनपाने विविध कार्यक्रम राबवित केला प्रजासत्ताक दिन साजरा

भिवंडी,ता.२७  : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी महानगरपालिका मुख्यालयात मराठी भाषा पंधरवडा निमीत्त ग्रंथ प्रदर्शनाचे तसेच ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा पंधरवडा तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त पोवाडयाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मनपाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.      […]

Continue Reading

भिवंडीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन

भिवंडी २७ :  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील भव्य पटांगणात रविवारी सकाळी ८-१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रसंगी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय पां. जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, उपाध्यक्षा अरुणा प्रकाश जाधव, श्रीराम नागो भोईर, […]

Continue Reading