भिवंडीत नामदेव महाराज ६७६वा संजीवन समाधी सोहळा संपन्न.

भिवंडी : श्री संत शिरोमणी नामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६वा संजीवन समाधी सोहळा आज भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय  उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सर्वत्र भजन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.             भिवंडी शहरातील श्री गोपाळकृष्ण मंदिर सभागृहात […]

Continue Reading

भिवंडीत इस्कॉन मंदिरात श्री झूलन यात्रा महोत्सव

भिवंडी :  जगन्नाथ रथयात्रेच्या अभूतपूर्व यशानंतर इस्कॉन भिवंडीतर्फे २३ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत श्री श्री राधा माधव झूलन यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सहा दिवसीय आध्यात्मिक महोत्सवात दररोज आकर्षक पुष्पसजावटीने सुशोभित झुल्यावर श्री श्री राधा माधव यांना विराजमान करून विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.             […]

Continue Reading

महापालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार? जाब विचारीत राकाँपा शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांचे आंदोलन

भिवंडी : भिवंडीतील जनतेवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. शहरातील खड्डेमय रस्ते, रेयान एंटरप्रायझेस कंपनीमुळे अडचणीत सापडलेल्या लघु व्यापाऱ्यांच्या समस्या तसेच कोहिनूर इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू होऊनही दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) भिवंडी शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी […]

Continue Reading

मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास महामार्गाची दुरवस्था. होत आहे वाहतूक कोंडी

भिवंडी : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अविरत पावसाने मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास व जूना भिवंडी ठाणे महामार्गाचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असूनही या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.तसेच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Continue Reading

त्या नगरसेवकास अपात्र ठरवले जाऊ शकते.

उघडा डोळे वाचा नीट  भिवंडी : महाराष्ट्रात, एखाद्या नगरसेवकाने आपल्या जोडीदाराला किंवा नातेवाईकाला ‘नगरसेवक’ या अधिकृत पदाचा वापर करून स्वतःच्या वतीने काम करण्याची परवानगी दिल्यास, त्या नगरसेवकास अपात्र ठरवले जाऊ शकते. केवळ निवडून आलेल्या उमेदवारालाच अधिकृत कर्तव्ये पार पाडण्याचा कायदेशीर अधिकार असतो; प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या कोणाला तरी काम करू देणे (प्रॉक्सी), अधिकाराचा अनधिकृत वापर करणे […]

Continue Reading

भिवंडीत जुगार अड्ड्यांची वाढ ; महिलांनी उघडकीस आणले रॅकेट

भिवंडी :  भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात पुन्हा बेकायदेशीर ‘मटका’ जुगार अड्डे सुरु होऊन त्यामध्ये  वाढ झाल्याने या परिसरात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. या पूर्वी पोलिसांच्या कारवाईमुळे बंद पडलेले जुगाराचे अड्डे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आणि स्थानिक महिलांनी पुढाकार घेत एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि या अवैध […]

Continue Reading

भिवंडीत डिलीट मतांविषयी नाही जागृती, पुन्हा उमेदवारांना बसणार मतांचा फटका

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांच्या नावासमोर डिलीट लिहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे हजारो मतदारांना मतदान करता आलेले नाही. मात्र या बाबत स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जागृती नसल्याने विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारांना मतदानाचा फटका बसणार आहे.                    गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या […]

Continue Reading

भिवंडीत महायुतीच्या प्रचारासाठी खासदार रवी किशन यांची सभा संपन्न

भिवंडी : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून, भिवंडी पश्चिम विधानसभेतील भाजपचे महायुतीचे उमेदवार महेश चौगुले यांच्या निवडणूक प्रचारासाठी भंडारी चौकात उत्तर भारतीय आघाडीच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी चित्रपट कलाकार, निर्माते, गोरखपूरचे खासदार रवि किशन हे उपस्थित झाले होते.               भिवंडी पश्चिम महायुतीचे भाजप […]

Continue Reading

भिवंडीत तेलंगणा वासियांचा पोशम्मा, देवीसाठी हजारो कोंबड्यांचा बळी

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे दोन लाखापेक्षा जास्त तेलंगणावासी तेलगू समाजाचे लोक राहत असून तेलंगणातील प्रत्येक उत्सव येथील हे तेलंगणावासी वर्षानुवर्षे साजरा करीत आले आहेत. तेलंगणामध्ये तत्कालीन असलेल्या गरिबीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजाराने अनेक बळी जात होते. त्यामुळे प्रत्येक गावात गावदेवीची पूजा बांधून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी देवीला साकडे घातले जात होते. तसेच कुटुंबाकडून […]

Continue Reading

महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडीच्या वतीने पत्रकार दिन साजरा

भिवंडी : शहरातील दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या महानगर प्रेस असोशिएशन ऑफ भिवंडी या संस्थेच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी महानगरपालिका उपायुक्त दीपक झिंजाड,वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. […]

Continue Reading