भिवंडी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ ‘पालखी पादुका परिक्रमा’ कार्यक्रमानुसार भिवंडीत कोंबडपाडा येथील स्वामीसुत निवास,झळके सदन या ठिकाणी पालखी दर्शन सोहळा आयोजित केला आहे.
भिवंडीत श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे २९ वे दर्शन असून या वर्षी प्रथमच पालखी मुक्कामी राहणार आहे. शुक्रवार, दि. २२/०५/२०२६ रोजी सकाळी १० वा. वाजता पादुका आगमन होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ वा. व सायं. ६ ते रात्री १० वा. पर्यंत भाविकांना पादुका दर्शन मिळणार आहे. याच दिवशी दुपारी १२ ते २.३० वा. पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्वामी भक्तांनी पादुका पालखी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा व अन्नदान सेवेत सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

