भिवंडीत नामदेव महाराज ६७६वा संजीवन समाधी सोहळा संपन्न.

ठाणे धार्मिक।भविष्य भिवंडी महारष्ट्र
भिवंडी : श्री संत शिरोमणी नामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६वा संजीवन समाधी सोहळा आज भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय  उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सर्वत्र भजन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
            भिवंडी शहरातील श्री गोपाळकृष्ण मंदिर सभागृहात सकाळी संजीवनी समाधीसोहळ्या निमित्त ह.भ.प.भागवताचार्य श्री.गणेश महाराज पुलकुंठवार किर्तन सोहळा व महाआरती करण्यात आली. निमित्ताने आमदार महेश चौघुले, नगरसेवक रोमा निलेश आळशी, अँड. जितेंद्र शेटे प्रदिप राका,निलेश आळशी, गजानन शेटे व शेकडो समाज बांधवांसह भाविकांनी संत नामदेव महाराज व विठ्ठल-रखुमाई मुर्तीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
   यावेळी समाजाचे अध्यक्ष महेंद्र माडकर व भानुदास भसाळे यांच्या हस्ते ह.भ.प.भागवताचार्य श्री.गणेश महाराज पुलकुंठवार व आमदार महेश चौघुले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भिवंडीसह विविध शहर व ग्रामीण भागातील समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव शिंपी समाज बांधवांनी अथक मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *