मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास महामार्गाची दुरवस्था. होत आहे वाहतूक कोंडी

Blog ठाणे भिवंडी महारष्ट्र
भिवंडी : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अविरत पावसाने मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास व जूना भिवंडी ठाणे महामार्गाचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असूनही या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.तसेच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे, अशी विनंती मागणी परिसरातील नागरिक,प्रवासी ,नोकरदार वर्गाकडून होत आहे
                   पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच दुचाकी व चार चाकी वाहनांचे अपघातही होऊ लागले आहे, गेल्या आठवड्याभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन ते तीन लोक जखमी झाले आहेत. भिवंडी बायपास महामार्गावरील सोनाळे गांव,चाविंद्रा रोड, पिंपळास, हायवे दिवे, कल्याण रोड,कोनगाव, अंजूर फाटा ते कशेळी पर्यंतचा सुमारे २५ किमीचा पट्टा सर्वात जास्त खराब झाला आहे. डांबर व साईड पट्टी पेव्हर ब्लॉक उखडून गेल्याने  खोल खड्डे निर्माण झाले आहेत.गेल्या १०दिवसांत खड्ड्यांमुळे ६ पेक्षा अधिक छोटे-मोठे अपघात नोंदवले गेले आहेत. २ दिवसांपूर्वी खड्ड्यात दुचाकी घसरून दोन तरुण गंभीर जखमी व दोघाचा अपघाती मृत्यू झाला आहे. खराब रस्ता व खड्ड्यांमुळे चारचाकी व दुचाकी वाहन नादुरुस्त होत आहेत. भिवंडी-ठाणे २० कि.मी अंतर कापायला दोन ते अडीच तास लागत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका आणि शालेय बसनाही याचा फटका बसत असल्याची खंत शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद यांनी व्यक्त केली. वाहतूक कोंडी मुळे डिझेलचा खर्च वाढला आहे त्यामुळे वाहन चालकांना आर्थिक फटका बसत आहे. राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग वेळेत दुरुस्त न झाल्यास येत्या सणासुदीच्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी व्यक्त केले आहे.
                                           नियमित वाचा        लोकप्रसारासाठी इतरांना पाठवा 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *