भिवंडी मनपाने विविध कार्यक्रम राबवित केला प्रजासत्ताक दिन साजरा

ठाणे भिवंडी राजकीय सामाजिक
भिवंडी,ता.२७  : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी महानगरपालिका मुख्यालयात मराठी भाषा पंधरवडा निमीत्त ग्रंथ प्रदर्शनाचे तसेच ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा पंधरवडा तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त पोवाडयाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मनपाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.   
                     प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेने सुरु केलेल्या संकेतस्थळाचे लोकार्पण प्रशासक तथा आयुक्त यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच शहरातील महात्मा ज्योतीबा फुले नगर नंबर १ आसबीबी रोड भिवंडी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले असुन नागरिकांनी आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे. तसेच महानगरपालिकेच्या मुख्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास महानगरपालिका कर्मचा-यांनी चांगला प्रतिसाद दिला.
भिवंडी महानगरपालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट व चांगले काम केले आहे अशा कर्मचाऱ्यांचा प्रशासक तथा आयुक्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
 या कार्यक्रमासाठी मनपा अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, उप-आयुक्त (मुख्यालय) शैलेश दोंदे, उप-आयुक्त (कर) बाळकृष्ण क्षिरसागर, उप-आयुक्त (समाज कल्याण) प्रणाली घोंगे, उप-आयुक्त (शिक्षण) डॉ. अनुराधा बाबर, शहर अभियंता जमीर पटेल, मुख्य लेखा परिक्षक मयुर हिंगाणे तसेच सर्व प्रभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. झेंड्याला मानवंदना दिल्यानंतर सर्वांनी संविधान उद्देशिका, हरित शपथ, तंबाखू मुक्त भारताची शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *