भिवंडीत बाईक रॅली व चौक सभांनी गाजला शेवटचा दिवस, उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

ठाणे भिवंडी राजकीय

भिवंडी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी संपल्याने सायंकाळ पूर्वी सकाळपासून महायुती,महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी भिवंडी पूर्व,पश्चिम व ग्रामीण मतदार संघात बाईक रॅली व  पायी मतदारांशी संपर्क करीत चौक सभा करून शेवटचा दिवस गाजवला.भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्या थेट लढत होत असताना महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी व महाविकास आघाडीचे समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांनी भव्य बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत मतदारांना आपल्या पारड्यात मते टाकण्यासाठी आवाहन केले.या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलास पाटील यांनी देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली काढली होती.या मतदासंघात महायुतीचे भाजप उमेदवार महेश चौघुले यांनी बाईक रॅली काढत नजराना कंपाउंड परिसरातील स्वामीनारायण मंदिर सभागृहात सभेचे आयोजन केले होते.महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दयानंद चोरघे यांनी देखील बाईक रॅली काढली होती.शहरातील समरू बाग येथे काँग्रेस नेते खा.इम्रान प्रतापगडी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते.मात्र वेळे अभावी येथे प्रतापगडी पोहचू शकले नाही.त्यामुळे प्रतापगडी यांनी मोबाईल वरून काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले.तर समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आजमीयांनी मतदार संघात बाईक रॅली काढून प्रचार केला.तर एमआयएमचे वारिस पठाण यांनी देखील बाईक रॅली काढून पश्चिम मतदार संघात प्रचार केला.भिवंडी ग्रामीण मतदार संघात महाविकास आघाडीचे उद्धव सेनेचे उमेदवार महादेव घाटाळ यांनी पडघा परिसरात बाईक रॅली काढून प्रचार केला, तर महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार शांताराम मोरे यांनी अंबाडी परिसरात बाईक रॅली काढून प्रचार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *