भिवंडी : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून, भिवंडी पश्चिम विधानसभेतील भाजपचे महायुतीचे उमेदवार महेश चौगुले यांच्या निवडणूक प्रचारासाठी भंडारी चौकात उत्तर भारतीय आघाडीच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी चित्रपट कलाकार, निर्माते, गोरखपूरचे खासदार रवि किशन हे उपस्थित झाले होते.
भिवंडी पश्चिम महायुतीचे भाजप उमेदवार महेश चौगुले यांच्या प्रचारासाठी आलेले रवि किशन यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, उत्तर भारतीयांसह भोजपुरी भाषेत भाषण करून त्यांची मने जिंकली. रवी किशन यांनी जनतेला संबोधित करताना जातीच्या आधारे वेगळे न होता सनातन धर्मासाठी केवळ हिंदूच्या नावावर मतदान करा आणि एक है तो नेक है या मोदीच्या विचारांने मतदान करा,असे भोजपुरी भाषेत सांगितले. या सभेत उपस्थित स्त्री-पुरुषांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड.हर्षल पाटील,नगरसेवक नीलेश चौधरी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

