भिवंडीत तेलंगणा वासियांचा पोशम्मा, देवीसाठी हजारो कोंबड्यांचा बळी

धार्मिक।भविष्य भिवंडी महारष्ट्र
भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे दोन लाखापेक्षा जास्त तेलंगणावासी तेलगू समाजाचे लोक राहत असून तेलंगणातील प्रत्येक उत्सव येथील हे तेलंगणावासी वर्षानुवर्षे साजरा करीत आले आहेत.

तेलंगणामध्ये तत्कालीन असलेल्या गरिबीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजाराने अनेक बळी जात होते. त्यामुळे प्रत्येक गावात गावदेवीची पूजा बांधून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी देवीला साकडे घातले जात होते. तसेच कुटुंबाकडून बळी देण्याचा प्रघात सुरु झाला. त्यामुळे वर्षानुवर्षे हि प्रथा सुरु झाली. तेलंगणाचे कुटुंब देशात कोठेही राहत असेल तेथे जवळच्या देवीच्या देवळात जाऊन हि पूजा केली जात आहे.भिवंडीची गावदेवी म्हणून वऱ्हाळादेवीचा मान आहे. त्यामुळे या देवळात आषाढ कृष्ण पक्षात आमावास्येपर्यंत तेलंगणातील तेलगू कुटुंबाची गर्दी असते. येथे मोठ्यासंख्येने उपस्थित राहून देवीची पूजा करून आपल्या कुटुंबासाठी साकडे घालतात.तसेच होमकुंड आणि तेथील पुरातन वृक्षाची पूजा करून होमकुंडात नैवेद्य वाहतात.

काल मंगळवारी सकाळपासून मोठ्या संख्येने तेलगू कुटुंबाने गर्दी केली होती. या भक्तगणांसाठी श्री वऱ्हाळादेवी ट्रस्टच्या वतीने विनोद पाटील, अखिल पद्मशाली समाज,भिवंडीच्या वतीने अध्यक्ष रामकृष्ण पोटाबत्तीनी आणि कार्याध्यक्ष राजू गाजेंगी तसेच पद्मशाली समाज युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वासम यांनी चोख व्यवस्था करून भक्तगणांना प्रसादाची सोय केली. या वेळी भाजप आमदार महेश चौगुले,शहराध्यक्ष संतोष शेट्टी,माजी नगरसेवक सुमित पाटील यांनी देखील दर्शन घेऊन भक्तगणांच्या उत्सवात सामील झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *