मधुमेही रुग्णांमध्ये मोतीबिंदुची समस्या चिंताजनक

ठाणे महारष्ट्र


भिवंडी,ता. (बातमीदार) : मधुमेही रुग्णांमध्ये मोती बिंदुची समस्या तीव्रतेने वाढत असून अशा वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करताना अचूकता बाळगणे गरजेचे असून त्यासाठी रोबोटिक सर्जरी ही महत्त्वाची ठरते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉ अनुष्का शर्मा यांनी केले आहे. त्या भिवंडी येथील नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( निमा ) या डॉक्टरांच्या संमेलनात बोलत होत्या.


महाराष्ट्रात आज पर्यंत फक्त सहा रुग्णालयात रोबोटिक सर्जरी प्रणाली उपलब्ध असून भिवंडी सारख्या मध्यमवर्गीय शहरात प्रथमच अनुष्का नेत्र रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध असून याचा लाभ भिवंडी शहर ग्रामीण सह ठाणे जिल्ह्या तील रुग्णांना होणार आहे. पूर्वीच्या काळी मोतीबिंदू वयोवृध्द रुग्णांमध्ये आढळून येत असे पण आजच्या आधुनिक जगात जीवन शैली जसजशी बदलत गेली तशी मोतीबिंदू ची समस्या ही सर्व वयोगटात होण्यास सुरवात झाली आहे असे स्पष्ट करीत अनुष्का शर्मा यांनी आज पर्यंत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय तज्ञ आपापल्या पद्धतीने रुग्णांच्या डोळ्याची काळजी घेत असत पण रोबोटिक सर्जरी यंत्रणेमुळे त्यामध्ये अचूकता येऊन रुग्णांना त्यानंतर होणाऱ्या त्रासा पासून वाचविता येईल असे प्रतिपादन डॉ अनुष्का शर्मा यांनी केले.या प्रसंगी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. फैजान अन्सारी,सरचिटणीस डॉ रशीद सय्यद, खजिनदार डॉ अन्वर अंजुम,महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ.सबिस्ता अन्सारी,अनुष्का नेत्र रुग्णालयाचे जगदीश शर्मा यांसह मोठ्या संख्येने डॉक्टर मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *