आपला पद्मानगर सुशोभीकरण चौकचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न

भिवंडी


भिवंडी ता.(बातमीदार) : पद्मानगर भागाची ओळख अधोरेखित करणाऱ्या आपला पद्मानगर चौकाचे लोकार्पण रविवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . याप्रसंगी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक,आमदार महेश चौघुले,पालिका आयुक्त अजय वैद्य,अखिल पद्मशाली समाज अध्यक्ष रामकृष्ण पोटाबत्तीनी,आर पी आय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड,भाजपा माजी नगरसेवक श्याम अग्रवाल,भाजपा सरचिटणीस राजू गाजंगी,
भाजप शहर उपाध्यक्ष राजेश शेट्टी,प्रवीण मिश्रा,
महिला मोर्चा शहराध्यक्ष सुनीता यशवंत टावरे,
महिला प्रदेश सचिव ममता परमाणी,पालिका शहर अभियंता सुरेश भट,माजी शहर अभियंता एल पी गायकवाड,कनिष्ठ अभियंता हरेश म्हात्रे,
वसीम अन्सारी स्वाभिमान सेवा संस्थेचे विजय गुज्जा यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
शहर सुंदर सुशोभित असल्यास नक्कीच शहर विकासाला चालना मिळण्यास वाव असतो,त्यासाठी पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी नागरीक यांनी सुद्धा पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.तर आमदार रवींद्र फाटक यांनी आपण उपलब्ध करून दिलेल्या मूलभूत सुविधा निधीतून चांगले काम उभे राहिल्याचे समाधान व्यक्त केले.या प्रसंगी प्रास्ताविक करताना स्थानिक माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी शहरातील पद्मानगर भाजी मार्केट ते वऱ्हाळ देवी रोड चौक या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करण्यासाठी स्थानिक व्यापारी निवासी मालमत्ताधारकांनी स्वतः हुन पुढाकार घेत विकास कार्यात सहकार्य दिल्याने हे सुशोभीकरण बनविता आल्याचे सांगत स्व.प्रेमाताई पाटील सांस्कृतिक केंद्र इमारतीची दुरवस्था झाल्याने तेथे नव्याने सांस्कृतिक केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी संतोष शेट्टी यांनी केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *